नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तसेच वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आहे. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आंबील ओढ्यालगतची अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती
पुणे : आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून तात्काळ कारवाई थांबवण्यात आली आहे. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३३ येथील आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं केली आहेत. अशा परिस्थितीत पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबते, त्यामुळे येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस पुणे महापालिकेने काढली होती. […]
सेक्स लाईफ आणि वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी महत्वाच्या, जाणून घ्या…
यशस्वी विवाहासाठी फक्त प्रेम असणे पुरेसे नसते. रिलेशनशिप एक्सपर्ट्स सांगतात की नात्यात प्रेम आणि विश्वास याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आहे. वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्यासाठी प्रेम आणि विश्वास, उत्तम सेक्स लाईफ याबरोबरच आपल्या जोडीदाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. वैवाहिक जीवनात चांगली सेक्स लाईफ महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लैंगिक संबंधांशिवाय जोडप्यांमधील संबंध जास्त […]
धक्कादायक! सिझेरियन ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून झाली मोठी चूक, महिलेचा मृत्यू
बुलढाणा : शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून झालेली एक चूक एका कुटुंबाला खूपच महागात पडली आहे. सिझेरियन ऑपरेशनदरम्यान एक कापसाचा बोळा महिलेच्या पोटात राहिला. जेव्हा 2 महिन्यांनंतर हे उघडकीस आले तेव्हा त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमधील कवठाळ येथे ही धक्कादायक घटना घडली […]
तरुणाने पत्नीची दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून केली हत्या, त्यानंतर…
जळगाव : एका तरुणाने पत्नीची बाजारात दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून हत्या केली. बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पत्नीच्या माहेरी जाऊन मेहुण्यावर चॉपरने वार केले. त्यानंतर पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी पुन्हा हा तरुण बाजारात आला, त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत पूजा […]
राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले, राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई : राज्यातील सात जिल्ह्यांत आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे […]
आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ, संप मागे
मुंबई : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता अशी १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि […]
राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका
मुंबई : राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना […]
मोठी बातमी : महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (GST) सुधारणा विधेयकाच्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ देय रकमेवरील […]
23 जून 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळीचा पुनर्विकास म्हाडा करणार मुंबई येथील गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाचे काम कालबद्धरितीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल. हे करीत असतांना पत्राचाळ येथील मूळ 672 गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा हिस्सा / […]









