यशस्वी विवाहासाठी फक्त प्रेम असणे पुरेसे नसते. रिलेशनशिप एक्सपर्ट्स सांगतात की नात्यात प्रेम आणि विश्वास याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आहे. वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्यासाठी प्रेम आणि विश्वास, उत्तम सेक्स लाईफ याबरोबरच आपल्या जोडीदाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सुद्धा खूप महत्वाचे आहे.
वैवाहिक जीवनात चांगली सेक्स लाईफ महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लैंगिक संबंधांशिवाय जोडप्यांमधील संबंध जास्त काळ स्थिर राहत नाही आणि नात्यात उदासीनता येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की दोघांमधील नाते केवळ लैंगिक संबंधांतूनच गहिरे होईल. ज्या व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या भावनिक गरजा पूर्ण करतात, त्यांची सेक्स लाईफ देखील खूप चांगली असते. जे लोक आपल्या जोडीदाराची शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काळजी घेतात, त्यांना सेक्स करताना जोडीदाराकडून तितका आनंद मिळतो. ही एकप्रकारे एकमेकांविषयी वाटणारी कृतज्ञता असते. या भावनेमुळे दोघे नेहमीच एकमेकांकडे आकर्षित होतात.
सेक्स लाईफ आणि वय यांच्यात काय आहे संबंध? २२ वर्षे केलेल्या संशोधनात आलं समोर…
कृतज्ञता दर्शविणारी आणि एकमेकांना वेळोवेळी मदत करणारी जोडपी नेहमीच आदर्श नातं निर्माण करतात. एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने जोडप्यांमधील लैंगिक संबंधदेखील मैत्रीपूर्ण होतात आणि त्यातील नावीन्य आणि ताजेपणा टिकून राहतो. तज्ञ सांगतात की जोडप्यांनी नेहमी एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा. कधीतरी एकमेकांबरोबर बाहेर जावे, एकमेकांना वेळोवेळी भेटवस्तू द्याव्यात. प्रेम आणि काळजी घेतल्याबद्दल एकमेकांचे आभारही मानायला हवेत. यातून आपण समोरच्या व्यक्तीसाठी खास आहोत, ही भावना सुखावून जाते. जोडप्यांनी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय अंगीकारली पाहिजे. या गोष्टी करून बघा, नक्कीच हे ‘खास’ नाते घट्ट होण्यास मदत मिळेल.
उत्तम सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…