मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
धक्कादायक! जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर जेलमध्ये केला बलात्कार
राजस्थान : राजस्थानमधील जोधपूर कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तेथून पळ काढल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जोधपूरच्या खुल्या कारागृहात (open-air jail) कैदेत होता अशी माहिती मिळाली आहे. या आरोपीवर खुनाचा आरोप असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. […]
पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात
मुंबई : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी […]
‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना मिळणार नियमानुसार परतावा
मुंबई : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना […]
‘मैत्रेय’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई
मुंबई : मैत्रेय कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध एकूण ३२ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री देसाई यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांना न्याय मिळण्याच्या […]
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी केली प्रकृतीची चौकशी
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसल्याची माहिती मिळाली आहे. अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. […]
धक्कादायक! गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला पंख्याला उलटं टांगून केली मारहाण
राजस्थान : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलाला छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगून बेदम मारहाण केली. या मुलाने शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोली […]
मोठी बातमी! पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू
मुंबई : पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाचवीपासूनचे वर्ग याआधीच सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आवश्यक ती कोरोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिली ते चौथी या वर्गातील […]
महाराष्ट्रात गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी सुरु, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री […]
एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लॅन महागले, जाणून घ्या नवे दर
एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेही प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. हे नवीन दर एअरटेलच्या दराप्रमाणेच आहेत. Vodafone Idea चे नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. Vi ने आपला बेस प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपये केला आहे. या प्लॅनचे फायदे एअरटेल सारखेच आहेत. टेलिकॉम कंपन्यांचे हे पाऊल सरासरी रेव्हेन्यू प्रती युझर (ARPU) वाढवण्यासाठी आहे. टॅरिफ […]









