तेलंगणा : तेलंगणामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना या डॉक्टरांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडल येथील एका नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांचा कार्डीयॅक अरेस्टमुळे अनपेक्षित मृत्यू […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत
मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण […]
29 नोव्हेंबर 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात […]
आता Jio चेही प्रीपेड प्लॅन महागले, ‘असे’ असतील नवे दर
एअरटेल आणि Vi नंतर रिलायन्स जिओनेही आपले प्रीपेड प्लॅन दर वाढवण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू होतील. नवीन दर लागू झाल्यानंतर, प्रीपेड प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना 500 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने JioPhone वापरकर्त्यांसाठी अमर्यादित प्लॅनची (अनलिमिटेड प्लॅन) किंमतही वाढवली आहे. या प्लॅनची किंमत आता 91 रुपयांपासून सुरू होईल. […]
कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरिएंट ओमिक्रॉन किती घातक आहे? जाणून घ्या…
कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरिएंट B.1.1.529 (ओमिक्रॉन) ने जगासमोर एक नवीन संकट निर्माण केले आहे. WHO ने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील तज्ञांचा दावा आहे की ओमिक्रॉन सारख्या धोकादायक प्रकारांवर मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा कोणताही प्रभाव होत नाही. या प्रकारातील ताकद आणि वैशिष्ट्यांबाबत अनेक नवीन गोष्टीही समोर आल्या आहेत. ओमिक्रॉन किती घातक आहे? दक्षिण आफ्रिकेसह इतर […]
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे, मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे […]
भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार
पुणे : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार […]
राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टी परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, […]
कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना होणार दंड
मुंबई : राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी […]
चिंता वाढली! कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट आहे खूपच धोकादायक
कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटची दहशत जगातील काही देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तथापि, अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की भारतात या नवीन व्हेरिएंटचे कोणतेही प्रकरण आतापर्यंत नोंदवले गेले नाही. दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार सापडले आहेत. त्यामुळे तेथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटननंतर इस्रायलनेही आफ्रिकन देशांवर प्रवासासाठी बंदी घातली आहे. विविध […]








