Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र मुंबई

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि किनारपट्टी परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हवामान खात्याकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना मंगळवारी येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे जास्त प्रभावित होतील. तर मुंबई, ठाणे, पुणे येथे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत