new covid19 variant found in south africa

चिंता वाढली! कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट आहे खूपच धोकादायक

कोरोना ग्लोबल

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटची दहशत जगातील काही देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तथापि, अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की भारतात या नवीन व्हेरिएंटचे कोणतेही प्रकरण आतापर्यंत नोंदवले गेले नाही. दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार सापडले आहेत. त्यामुळे तेथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटननंतर इस्रायलनेही आफ्रिकन देशांवर प्रवासासाठी बंदी घातली आहे. विविध देशांमधील भीतीच्या वातावरणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार खूप धोकादायक आहे कारण त्याचा संसर्ग खूप वेगाने पसरतो. याशिवाय, तो लसीचा प्रभाव कमी करतो किंवा संपवून टाकतो. तसेच, हा मूळ व्हायरसपेक्षा खूपच वेगळा आहे.

ब्रिटनने या व्हेरिएंटबाबत यापूर्वीही इशारा दिला होता. यामध्ये बोत्सवानामध्ये 32 उत्परिवर्तन आढळून आले आणि त्यांच्यावर लसीचा कमी परिणाम झाला. आता ऑस्ट्रेलियानेही या नवीन प्रकाराची चाचणी घेण्याची घोषणा केली आहे. जर धोका वाढला तर ते आफ्रिकन देशांवर प्रवासासाठी निर्बंधही लादू शकतात, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. दरम्यान, या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर, ब्रिटनने आफ्रिकेतील सहा देशांमध्ये उड्डाणांवर बंदी घातली आहे. यूकेकडून असे सांगण्यात आले आहे की नवीन व्हेरिएंट B.1.1.529 मध्ये स्पाइक प्रोटीन आहे, जे कोरोना विषाणूच्या मूळ स्वरूपापेक्षा वेगळे आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी नवीन व्हेरिएंटबाबत सांगितले आहे की तो अधिक संक्रमित आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले की, आम्ही याबाबत खूप फ्लेक्सिबल आहोत. जर वैद्यकीय सल्ला बदलावा लागेल, तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही. एक देश म्हणून, जर सीमा बंद कराव्या लागल्या किंवा लोकांना विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल तर तसे केले जाईल. विशेष म्हणजे, ब्रिटनने यापूर्वीच आफ्रिकन देश दक्षिण आफ्रिका, नामिबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे, लेसिथो आणि एस्वेटिनी यांच्यावर प्रवास बंदी लादली आहे. ब्रिटननेही येथून परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याची घोषणा केली आहे. यूके अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या व्हेरिएंटमुळे कोरोना लसीचा प्रभाव कमी होतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत