कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 47 हजार 418 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 84,592 लोक बरे झाले असून 380 लोकांचा मृत्यू झाला. सध्या देशात 11.17 लाख सक्रिय रुग्ण आहेत. तिसर्या लाटेत, सक्रिय प्रकरणांची संख्या प्रथमच 11 लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी मंगळवारी १.९३ लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी
मुंबई : महिला आणि बालविकास विभागामार्फत महिला आणि बालक सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन विकास योजनेच्या वार्षिक निधीतून प्रतिवर्षी अंदाजे 450 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे महिला व बालविकास मंत्री […]
12 जानेवारी 2022 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ४६.४५ […]
पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
नागपूर : मंगळवारी संपूर्ण विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याकडून यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या […]
मानवनिर्मित कालव्याने वन्य प्राण्यांना धोका, हत्तींच्या कळपाला कालव्यातून बाहेर पडता येईना, घटनेचा व्हिडिओ आला समोर…
कर्नाटक : माणसाने केलेला विकास अनेकदा वन्य प्राण्यांना धोका निर्माण करतो. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर हत्तींचा कळप कालव्यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची घटना सोमवारी घडलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, कालव्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या हत्तींच्या व्हिडिओने आता गंभीरपणे विचार करायला भाग पाडले आहे. सोशल […]
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की आज माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे आणि मी होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी […]
मुंबईत आढळले 11,647 नवीन कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या लाखावर
मुंबईत गेल्या 24 तासांत 11,647 नवीन कोविड-19 प्रकरणे आणि दोन संबंधित मृत्यूंची नोंद झाली आहे, ज्यामुळे रुग्णांची संख्या 1,00,523 वर पोहोचली आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर निधी विहित वेळेत खर्च करा – पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर निधी जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 साठी 288.68 कोटी […]
लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना
मुंबई : महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी […]
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत आणि अनेक मालिकांमध्येही रेखा कामत यांनी काम केले. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले […]










