नागपूर : मंगळवारी संपूर्ण विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान खात्याकडून यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार आणि शनिवारीसुद्धा वातावरण ढगाळच राहणार आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी हा आठवडा अवकाळी पावसाचा ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
11 Jan, विदर्भात काही भागात पुढचे 3 दिवस विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाउस शक्यता.
आज विदर्भात काही ठिकाणी गारपीटची शक्यता, तसेच मराठवाड्यातील काही भागात गडगडाटासह हलका पाउस शक्यता.
– IMD pic.twitter.com/zpCugEN0B2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 11, 2022




