On the occasion of 410th Urs of Hazrat Dadapir Dargah Sharif Dr. Sunil Gaikwad joins Nilanga procession
महाराष्ट्र

हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने मा.खा. डॉ सुनील गायकवाड निलंगा मिरवणुकीत सामील

निलंगा : निलंगा येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले देवस्थान हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने आज कोरोनाच्या नियमांचे पालन करत चारचाकी वाहनातून सँदल (मिरवणूक)काढण्यात आली. त्यामध्ये विशेषतः दर्गा हजरत दादापीर चे सज्जादा नशीन सय्यद करीमउल्लाह नबीरा खादरी यांच्या अध्यक्षतेखाली लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड आणि निलंगा विधान सभेचे इच्छुक […]

Senior leader N. D. Patil
महाराष्ट्र

परिवर्तनवादी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई  : “महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतिशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब […]

Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा, कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना […]

Social Activist Professor N D Patil Passes Away At 93
कोल्हापूर महाराष्ट्र

दुःखद! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचं निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांसाठी नेहमीच पुढे येऊन संघर्ष करणारे नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एन. डी. पाटील […]

BIRJU-MAHARAJ
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे […]

Revenue Minister appreciates Somnath Gite de-addiction work
पुणे महाराष्ट्र राजकारण

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक

पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. तसेच अनेक शाळा-कॉलेजमध्ये जाऊन देखील व्यसनमुक्तीबाबत विचार मांडले आहेत. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. याची दखल घेत […]

Guwahati-Bikaner Express derailed
देश

ब्रेकिंग! बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली

कोलकाता : बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेस डोमोहनीजवळ रुळावरून घसरली.  बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस बंगालच्या उत्तर भागात मैनागुरीजवळ डोमोहनीजवळ रुळावरून घसरली आहे. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती असून सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत […]

man ear treatment by specialist doctor shocked insect in ear
ग्लोबल

कानात जाणवत होती हालचाल, तपासल्यावर डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का

न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती पाण्यात पोहून घरी परतली असता त्या व्यक्तीच्या कानात दुखू लागले. सुरुवातीला या व्यक्तीला हे सामान्य दुखणे वाटले आणि त्याने या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रकृती बिघडू लागली तेव्हा या व्यक्तीने हॉस्पिटल गाठले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का […]

Probationary officers of Indian Police Service called on the Deputy Chief Minister
महाराष्ट्र मुंबई

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची, शौर्याची परंपरा आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हा, पोलीस दलाची शान वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री […]

Selection of Chetan Jedhe as District Vigilance and Control Committee Member
पुणे महाराष्ट्र

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी चेतन जेधे यांची निवड

पुणे : राजेश देशमुख जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये चेतन जेधे यांची निवड जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे. या समिती मध्ये जिल्हातील राज्यसभा व लोकसभा सदस्य शरद पवार, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, गिरीश […]