मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. २००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज १ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल […]
महाराष्ट्राचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज पांडे पीवीएसएम, एवीएसएम, वीएसएम यांनी आज लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची आज सूत्रे स्वीकारली, ले. ज. मोहंती सोमवारी 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. ले. ज. पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर 1982 […]
सावर्डे येथील नदीवरील पूल बांधण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले ‘हे’ निर्देश
पालघर : मोखाडा तालुक्यातील सावर्डे गाव ते शहापूर तालुक्यातील गावाला जोडणारा वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे असे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सावर्डे गावाचे सरपंच हनुमंत पादीर व […]
मोदी सरकारचे बजेट केवळ उद्योगपती मित्रांसाठी, सर्वसामान्यांना दिलासा नाहीच
चंद्रपूर : मोदी सरकारने सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा देश उद्धवस्त करण्याची सातवी पायरी म्हणावी लागेल. बजेटचा पेपर कोराच आहे. शून्य गुणही देतांना विचार करावा लागतो. रोजगार निर्मितीची कोणतीही शाश्वती नाही. हे बजेट केवळ मूठभर कॉर्पोरेट सेक्टरला, काही विशिष्ट बड्या उद्योगपतींना मदत करणारे आहे. फक्त उद्योजकांना मोठे करण्याचा चंग या केंद्र सरकारने बांधला आहे, अशी […]
अर्थसंकल्प 2022 मीम्स : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इंटरनेटवर मिम्सचा धुमाकूळ…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मधील काही महत्त्वाचे बदल सामायिक केले. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा टॅग राखण्यासाठी, सीतारामन यांनी अद्ययावत रिटर्न भरण्याची प्रणाली सुरू केली आहे. क्रिप्टोअॅसेट्स आणि डिजिटल रुपयावरील काही महत्त्वाच्या घोषणांसोबतच, अर्थसंकल्पाने भारताच्या आर्थिक भविष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या चर्चांना सुरुवात केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्प सादर होताच मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर मीम्स आणि […]
राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली लागू, मिळतील ‘या’ सवलती
मुंबई : राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली […]
सिमेंट बांध कार्यक्रमाचे तालुकानिहाय आराखडे बनवताना टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य
मुंबई : सिमेंट बांध कार्यक्रमाचे तालुकानिहाय आराखडे बनवताना टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले. मंत्रालयातील दालनात मृद व जलसंधारण विभागाची सिमेंट बांध कार्यक्रम तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख बोलत होते. मंत्री गडाख […]
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]
अर्थसंकल्प 2022 : अर्थसंकल्पानंतर काय महागणार आणि काय होणार स्वस्त? जाणून घ्या…
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर कोणता भार वाढणार आणि कोणाकडून दिलासा मिळणार? हे जाणून घेऊयात… काय महाग आणि काय स्वस्त काय होणार स्वस्त? अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी […]










