भोपाळ : ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या ट्रेनच्या पॅंट्री कारमध्ये एका विक्रेत्याने या तरुणीवर बलात्कार केला. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे रात्री 12.25 च्या सुमारास भोपाळ स्थानकात पोहोचलेल्या ट्रेनमधून उतरलेल्या पीडितेने सांगितले. या घटनेनंतर ही ट्रेन स्टेशनवर सुमारे अर्धा तास थांबून एक वाजता हजरत निजामुद्दीनकडे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक
कोल्हापूर : एका टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितले की ‘गजानन महाराज शेगाव’ या मालिकेत त्याने भूमिका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पोळ याची शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यानं संबंधित महिलेशी […]
करचुकवेगिरी प्रकरणी दोघांना सुरत येथून अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, दि. 10 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांची आणि सुरत शहर पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्यामुळे हे अभियान अथक परिश्रमांनंतर दोन […]
रवीना टंडनला पितृशोक, चित्रपट निर्माते रवी टंडन यांचे निधन
मुंबई : रवीना टंडनचे वडील, निर्माते रवी टंडन यांचे आज, 11 फेब्रुवारी रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या जुहू, मुंबई येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल सांगताना तिच्या वडिलांसोबतच्या थ्रोबॅक फोटोंची मालिका शेअर केली. मिळालेल्या माहितीनुसार, रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे शुक्रवारी (11 फेब्रुवारी) […]
टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, धवन-कुलदीपचे पुनरागमन
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. केएल राहुलच्या जागी शिखर धवन, दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. कायरन पोलार्ड अजूनही तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी निकोलस […]
परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]
सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कार
पुणे : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२० सोमनाथ गिते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. […]
भयंकर! अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या, धडावेगळं केलेलं शीर घेऊन फिरत होता रस्त्यावर…
इराण : अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर फिरत होती. काही कॅमेऱ्यांनी हे भयंकर कृत्य टिपलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणमधून ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचं शीर हातात घेतलेल्या या […]
एका गानयुगाचा अस्त! स्वरलता, गानकोकिळा.. लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन..
मुंबई : भारताची गान कोकिळा, जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा […]
४ फेब्रुवारी : कर्करोग दिन – व्यसनाधीनता आणि कर्करोग
४ फेब्रुवारी म्हणजे जागतिक कर्करोग दिवस. जगभरात कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील कारण आहे. व्यसनांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून त्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मादक पदार्थांच्या वापराशी फुफ्फुस किंवा हृदयविकार, मानसिक आरोग्यस्थिती, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि कर्करोग यासारख्या अनेक आरोग्य समस्या जोडलेल्या […]










