newborn declared dead by doctors was found alive in the grave
देश

चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात कबरीत सापडलं जिवंत..

बनिहाल : जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. एका नवजात मुलीला म्हणजेच जन्मानंतर लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला दफन केल्यानंतर लगेचच सुमारे एका तासाच्या आत कबरीतून जिवंत बाहेर काढलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला होता आणि तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला […]

Leader of Opposition Devendra Fadnavis's letter to Chief Minister on Metro issue
महाराष्ट्र राजकारण

फडणवीसांचा मोठा दावा, राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करकपात केलीच नाही…

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले, लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. केंद्र […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

बारामती : शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोऱ्हाळे बु. स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, दि माळेगांव सहकारी साखर […]

Goat-sheep rearing is the best option to strengthen rural economy
महाराष्ट्र

शेळी पालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत असून या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. महिलांनी शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे. […]

Sri Lanka cricketer Kusal Mendis hospitalized after leaving field with chest pain
क्रीडा

श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिस छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

श्रीलंका : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे 23व्या षटकात मैदानाबाहेर नेण्यात आले. कुसल मेंडिसला छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा एक भाग म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंडिसला ढाका येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
महाराष्ट्र मुंबई

मंकीपॉक्सची भीती! मुंबईत मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार

मुंबई : जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत असताना, बेल्जियम हा मंकीपॉक्स आयसोलेशन सुरू करणारा पहिला देश बनला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली की त्यांनी संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात 28 खाटांचा वॉर्ड तयार ठेवला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजधानीत मंकीपॉक्सची कोणतीही प्रकरणे आढळलेली नाहीत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे. व्हायरल झुनोटिक रोगाबद्दल जारी केलेल्या सल्ल्यामध्ये, बीएमसीने […]

Nana Patole Letter To CM Uddhav Thackeray Over Obc Reservation
महाराष्ट्र मुंबई राजकारण

OBC आरक्षणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात […]

Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Sanjay Raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मेधा किरीट सोमय्यांकडून संजय राऊतांविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला […]

Spam Calls Will Stay Away With Trai Caller Id Feature
गॅझेट्स तंत्रज्ञान

मस्तच! आता स्कॅम कॉलचा धोका दूर करणार TRAI चे ‘हे’ फिचर, जाणून घ्या…

TRAI Caller Id Feature : जर तुम्ही स्पॅम कॉल्समुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून एक आनंदाची बातमी आहे. TRAI आता Truecaller सारखी कॉलर आयडी सुविधा सुरू करणार आहे. ट्राय अशा संकल्पनेवर काम करत आहे, ज्याद्वारे एखाद्याच्या फोनवर कॉल करणाऱ्याचे नाव त्याच्या सिमवरील केवायसीद्वारे ओळखले जाईल. स्पॅम कॉलच्या घटनांमध्ये होईल घट […]