नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळालेला नाही. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात विरोध केला होता. सत्येंद्र जैन यांना […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, टार्गेट किलिंग सुरूच…
जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा गोळ्या झाडलेला मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तुल काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. फारुख अहमद मीर (वय ५०) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पंपोरा येथील लेथपेरा येथे 23 बटालियन IRP मध्ये […]
कोरोनाचा धोका वाढला! गेल्या 24 तासांत आढळले 13 हजारांहून अधिक रुग्ण
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात एकूण 13,216 प्रकरणे समोर आली आहेत. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन आकडेवारीनंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 68 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 […]
भयंकर कृत्य! 7 वर्षांच्या मुलाने 14 वर्षांच्या मुलाला डिझेल ओतून पेटवले, उपचारादरम्यान मृत्यू
राजस्थान : एका ७ वर्षांच्या मुलाने 14 वर्षांच्या किशोरवयीन मुलावर डिझेल ओतून पेटवून दिले. राजस्थानमधील कोटा शहरातील उद्योग नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. अखेर महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या मुलाचे दुःखद निधन झाले. याप्रकरणी सात वर्षांच्या मुलावर त्याच्या शेजारच्या 14 वर्षांच्या मुलाला पेटवून मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेत […]
जगातील आठपैकी एक व्यक्ती जगतेय मानसिक विकारासह – जागतिक आरोग्य संघटना
जगातील आठपैकी एक व्यक्ती मानसिक विकारासह जगत आहे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या एका महत्त्वाच्या अहवालात मानसिक आरोग्य सेवेत बदल घडवून आणण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. साथीच्या रोगापूर्वी 2019 मध्ये, मानसिक विकार असलेल्या लोकांची संख्या जवळजवळ एक अब्ज होती, ज्यात जगातील 14 टक्के किशोरवयीन लोकांचा समावेश होता, ही संख्या गेल्या दोन वर्षांत […]
महिला स्वयंपूर्ण झाल्यास राज्याची जलद गतीने उन्नती – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ाती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. योजनांविषयी जागृती […]
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे – कृषीमंत्री दादाजी भुसे
कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषी विभागाची कोल्हापूर व […]
रक्तदान करा…! रक्तदाता म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे का? जाणून घ्या…
एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्त करते. म्हणूनच वेळोवेळी ‘रक्तदात्यांना रक्तदान’ करण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील. “रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. रक्त हे कृत्रिमरीत्या तयार होत नाही. ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात. यासाठी […]
येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारे वाहणार
मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर देखील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातही पावसाला पोषक वातावरण होत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात […]
ब्रेकिंग! पुढील २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट, एसएमएस सेवा बंद, हरियाणा सरकारचे आदेश
हरियाणा : हरियाणा सरकारने शुक्रवारी (17 जून) केंद्राच्या अग्निपथ भरती योजनेला होणाऱ्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता हे निर्बंध पुढील 24 तासांसाठी तात्काळ प्रभावाने लागू केले जातील. हरियाणा सरकारने नवीन सैन्य भरती धोरणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य कायदा आणि सुव्यवस्था स्थिती लक्षात […]










