मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज […]
28 दिवस उलटूनही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अजूनही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव हे बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 28 दिवस उलटूनही ते शुद्धीवर आलेले नाहीत. अलीकडेच, राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याचे आणि त्यांनी पत्नीचा हातही धरल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांना याबाबत विचारले असता […]
भारतात जी 20 परिषदेच्या 215 बैठका होणार, यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात
मुंबई : जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या तिन्ही शहरातील बैठकांचे नियोजन आणि एकूण तयारीची आढावा बैठक मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आणि जी २० परिषदेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकांचे आणि अनुषंगिक […]
वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा महाजन यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, हाफकिन संस्थेच्या श्रीमती चंद्रा, […]
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार, जाणून घ्या…
मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे. राज्य कला प्रदर्शनात इच्छुक कलाकारांकडून कलाकृती मागविण्यात येतात. प्रदर्शन संपल्यावर कलाकृती घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधीत कलाकाराची असते. मात्र, अनेक कलाकार आपली कलाकृती नेत नसल्याने निदर्शनात आले […]
दिल्लीत या दिवाळीतही फटाक्यांवर बंदी, पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची माहिती
दिल्ली : पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली सरकारने फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावरील बंदी 1 जानेवारी 2023 पर्यंत वाढवली आहे. ते पुढे म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) आणि महसूल विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. दिल्ली में लोगों को प्रदूषण के खतरे से बचाने के लिए […]
आता कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. तुम्ही समोरच्या सीटवर बसलात किंवा मागच्या बाजूला, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोठी गोष्ट म्हणजे चालकाच्या मागच्या सीटवर […]
Video! रेल्वे रुळावर रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघात, तरुणाला ट्रेनची जोरदार धडक
तेलंगणा : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मुलाचा रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघात झाला आहे. ही घटना तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील काझीपेट रेल्वे स्थानकाजवळची आहे. या अपघातात अक्षय राज नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा मुलगा समोरून […]
भयंकर कृत्य! पत्नीने प्रियकराच्या मदतीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट
उत्तर प्रदेश : एका पत्नीने तिच्या पतीवर अत्याचार करत पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने तिच्या प्रियकराची मदत घेत हे भयंकर कृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने प्रियकराच्या सोबतीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. दरम्यान, याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांसह घटनास्थळी […]










