The young man was making a reel on the railway track, a fierce collision with the train
ट्रेडिंग

Video! रेल्वे रुळावर रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघात, तरुणाला ट्रेनची जोरदार धडक

तेलंगणा : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मुलाचा रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघात झाला आहे. ही घटना तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील काझीपेट रेल्वे स्थानकाजवळची आहे. या अपघातात अक्षय राज नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा मुलगा समोरून चालत आहे आणि मागून ट्रेन येत आहे. त्यानंतर या मुलाला ट्रेनच्या इंजिनची इतकी जोरदार धडक बसली की मुलगा हवेत उडून जवळच ट्रॅकवर जोरात आदळतो आणि पडतो. वारंगल जिल्ह्यातील या मुलाचे नाव अक्षय राज असे असून त्याचे वय १७ वर्षे आहे. अपघातानंतर या मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत