पुणे : कणकवलीतील भाजप आमदार नितेश राणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते, असे सांगण्यात येत आहे. याविषयी माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्स टोल प्लाझा येथे झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. नितेश राणे आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध लालबागचा राजा येथे प्रार्थना करण्यासाठी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार
मुंबई : राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यास २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव […]
गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (LPG कमर्शियल सिलेंडर किंमत) 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी […]
महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी
सातारा : महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले […]
चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात […]
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. खालापुर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना दिल्या. सण-उत्सव, सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात […]
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी जिल्ह्यातील कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या महाराष्ट्र गौरव […]
आरे येथेच मेट्रो कारशेड होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वन विभागाची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीनीचा वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा […]
राज्यात 75 हजार पदांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या […]
आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत
मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते. यावेळी या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, देवराव होळी, सुलभा खोडके, आशिष जयस्वाल, राजेंद्र शिंगणे यांनी भाग घेतला. आरोग्यमंत्री […]









