मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने दि. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अनेक पुरुषांसोबत ठेवले लैंगिक संबंध आणि… पुरुषाला एकाच वेळी झाली मंकीपॉक्स, कोविड-19 आणि एचआयव्हीची लागण
इटलीतील एका 36 वर्षीय पुरुषाला एकाच वेळी मंकीपॉक्स, कोविड-19 आणि एचआयव्हीची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. तज्ञांनी निदर्शनास आणले की हे 3 विषाणूंचे पहिले ज्ञात सह-संक्रमण प्रकरण आहे आणि हे मिश्रण रुग्णाची स्थिती बिघडवू शकते की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या व्यक्तीला स्पेनच्या सहलीवरून परतल्यानंतर काही दिवसांनी ताप, थकवा आणि घसा खवखवणे […]
ब्रेकिंग! सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, आढळल्या अनेक जखमांच्या खुणा
Sonali Phogat’s Autopsy Report : भाजप नेत्या सोनाली फोगटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. सोनालीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार ही दुखापत कुठल्यातरी जड किंवा घन वस्तूमुळे झाली असावी. यापूर्वी गोवा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचा पीए आणि त्याच्या साथीदारावर बलात्कार, हत्येचा आरोप […]
ब्रेकिंग! ‘सनम बेवफा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन
मुंबई : दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सनम बेवफा, सौतन, साजन बिना सुहागन या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. ते त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते मेहमूद जूनियर उर्फ […]
ब्रेकिंग! सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा
गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फोगटच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या फोगट यांना हृदयविकाराचा संशय आल्याने त्यांना मंगळवारी सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर […]
शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
मुंबई : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर […]
अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार, मंत्री सांदीपान भुमरे यांची माहिती
मुंबई : अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री सांदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री सांदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची […]
ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद
मुंबई : राज्यातील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त […]
कोळीवाड्यांचा विकास नवीन नियमावलीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा […]
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी फेरपरीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी २०२२ या परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लगेच पुनर्परीक्षा घ्यावी याबाबत काही विद्यार्थ्यांची, संस्थांची तसेच संघटनांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झालेली आहेत. त्या अनुषंगाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता संबंधित विषयांचे योग्य आकलन होण्याच्या दृष्टीने उपचारात्मक अध्यापन (Remedial Coaching/ Bridge Courses) […]






