मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी, वन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळवा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
चंद्रपूर : चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरीता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना […]
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, 15 दिवसांनंतर उघडले डोळे
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. राजू हे सध्या दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांना शुद्धी आली आहे. राजूच्या व्यवस्थापकाने सांगितले की कॉमेडियनची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे. व्यवस्थापकाने पुढे सांगितले की एम्समधील डॉक्टर देखील त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून […]
दापोलीत दोन बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी, एक बस चालक गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज (२५ ऑगस्ट) सकाळी दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झाला आहे. एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बोरिवली – दापोली एसटी दापोलीकडे येत असताना […]
साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा, संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी पुरस्कार
नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2022 च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी […]
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना आता २० लाख रूपये अर्थसहाय्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना देण्यात येणाऱ्या १५ लाख रूपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करत ही रक्कम २० लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला. राज्याच्या वनविभागाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने […]
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध
मुंबई : गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्या मार्गावर ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश २३ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आले आहेत. २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (12 वाजेपासून) ते १० सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत […]
कोविड-19 कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेतू अध्ययन उपक्रम, चंद्रकांत पाटील यांचे विधान परिषदेत निवेदन
मुंबई : कोविड-१९ साथीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखण्यात काही मर्यादा आल्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमधील उणीव दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम परिपूर्णतेसाठी ‘Bridge Course’ ची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये “कोविड १९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता […]
रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुभाष देशमुख यांनी अधिवेशन […]
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार, काही ठराविक प्रकरणांविषयी केले जाईल कॅगचे विशेष ऑडिट
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक प्रकरणांविषयी कॅगचे विशेष ऑडिट येत्या काळात केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई आणि एमएमआर भागातील पायाभूत सुविधांच्या दूरावस्थेबाबत सत्तापक्षाच्या विधानसभा […]










