मुंबई : महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता आपण गमावला आहे, राज्याच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे पोलीस अधीक्षकांना समज, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य राम सातपुते, मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज […]
नितीश कुमार यांच्या महाआघाडीने जिंकला विश्वासदर्शक ठराव
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बिहार विधानसभेत आज कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘महागठबंधन’ आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टपूर्वी भारतीय जनता पक्षाचे विजय कुमार सिन्हा यांनी आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा […]
मोठी बातमी! राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन […]
राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात धोरण ठरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूण येथील वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थिती टाळण्यात आली आहे. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून यासंदर्भातील कारवाई युद्ध पातळीवर करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभेत आज चिपळूण येथील वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये […]
डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा […]
उत्तेजक कपड्यांबाबत ‘तो’ वादग्रस्त आदेश देणाऱ्या न्यायाधीशांची कामगार न्यायालयात बदली
केरळ : पीडितेने “लैंगिक उत्तेजक पोशाख” घातल्यास प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा खटला चालणार नाही, असा वादग्रस्त आदेश देणाऱ्या केरळच्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कोझिकोड एस कृष्णकुमार, ज्यांनी हा निकाल दिला, त्यांची कोल्लम जिल्ह्यातील कामगार न्यायालयाचे पीठासीन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीस केरळ उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात […]
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण
मुंबई : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत आपल्या नवीन ट्विटमध्ये माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “माझी कोरोना चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे… माझ्या आसपास आणि आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःचीही तपासणी करून घ्या.” T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that […]
111 कोटींच्या बनावट देयका प्रकरणी तिघांना अटक, महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 111 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी देयका प्रकरणी कारवाई करुन तिघांना अटक केली. किशोर कुमार मंजुनाथ पुजारी, अभिषेक पांडु शेट्टी, नितीन विनोद सावंत अशी त्यांची नावे असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मे. पुजारी ट्रेडर्स आणि इतर सहा कंपन्या मे. श्री साई ट्रेडर्स, मे. […]
तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, आत्महत्या करू नका… मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक पत्र
मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना […]










