पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
गांबियातील 66 मुलांच्या मृत्यूनंतर भारतात बनवलेल्या 4 कफ सिरपवर अलर्ट, कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले
नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरपचे नमुने गोळा केले आहेत आणि तपासणीसाठी पाठवले आहेत, ज्याचा कथितपणे गांबियातील 66 मुलांच्या मृत्यूशी संबंध आहे. या तपासणीचे निकाल दोन दिवसांत मिळणे अपेक्षित आहेत. हरियाणातील सोनीपतस्थित मेडेन फार्मास्युटिकलच्या उत्पादन केंद्रातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, DCGI चौकशी करत आहे की […]
बकऱ्यांचा बळी देताना चुकून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, दुर्गापूजेदरम्यान घडली भयंकर घटना
झारखंड : झारखंड मधील गुमला येथे बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, त्यानंतर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. झारखंड मधील गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपूर गावात ही घटना घडली. मंगळवारी महानवमीनिमित्त गावातील […]
थायलंडमध्ये मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार, लहान मुलांसह 31 जणांचा मृत्यू
थायलंड : थायलंडमधील ईशान्येकडील प्रांतातील मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान 31 जण ठार झाले, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर बंदुकधारी व्यक्तीने स्वतः वर देखील गोळी झाडली आणि आत्महत्या केली. पीडितांमध्ये मुले आणि प्रौढ दोघांचाही समावेश आहे, पोलिसांनी एका निवेदनात म्हटले […]
उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटना : बेपत्ता असलेल्या 27 गिर्यारोहकांचा शोध सुरू, 14 जणांना वाचवण्यात यश
उत्तराखंड : उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटनेत, हिमस्खलनामुळे 41 गिर्यारोहक प्रशिक्षक अडकून पडले होते. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे 41 गिर्यारोहक द्रौपदीच्या दांडा-2 पर्वतावर चढाईचे प्रशिक्षण घेत होते. त्यापैकी 34 प्रशिक्षणार्थी आणि 7 प्रशिक्षक होते. द्रौपदीच्या दांडा शिखरावर हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांपैकी 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 14 जखमींना वाचवण्यात यश आले आहे, […]
शाळकरी मुलांना आणि शिक्षकांना घेऊन जाणारी बस KSRTC बसला धडकली, 9 जण ठार तर 38 जखमी
केरळ : शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जाणारी पर्यटक बस केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसला आदळून भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वडाक्केंचेरी येथे अपघात झाल्यानंतर बस दलदलीत पडल्याने नऊ जण ठार आणि 38 जखमी झाले. मृतांमध्ये KSRTC बसमधील पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. वृत्तानुसार, राष्ट्रीय महामार्ग […]
VIDEO : रावण-दहन करताना मोठी दुर्घटना, लोकांच्या अंगावर पडला रावणाचा जळता पुतळा
हरियाणा : हरियाणातील यमुनानगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा भाविकांच्या अंगावर पडला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रावणाचा पुतळा लोकांवर पडताना दिसत आहे. लोकांच्या अंगावर पडलेला पुतळा पाहून जमावात एकच खळबळ उडाली. पुतळ्याच्या जवळ जाणाऱ्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न […]
भयंकर! पूर्वाश्रमीच्या पत्नीची जंगलात नेऊन बलात्कार करत हत्या, पतीचीही हत्या, 2 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
छत्तीसगड : सुरगुजा जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत एका गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा पूर्वाश्रमीचा पती असल्याचे निष्पन्न झाले असून, तो लग्नानंतर तिचा छळ करत असल्याने महिलेने त्याला सोडले होते. त्यामुळे आरोपीचा तिच्यावर राग होता. दरम्यान, ही महिला आसाराम यादवसोबत पत्नी म्हणून राहत होती. त्यामुळे आरोपीने सूडबुद्धीने महिलेच्या पतीवर आणि तिच्या […]
अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, पायलटचा मृत्यू
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तवांगजवळील फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे लष्कराचे चीता हेलिकॉप्टर आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास नियमित उड्डाण करताना क्रॅश झाले. त्यानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात […]
वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, अपघात कॅमेऱ्यात कैद
मुंबई : मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले […]










