Devendra Fadnavis gave an answer to Chief Minister Uddhav Thackeray
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास […]

Guardian Minister Mangalprabhat Lodha to launch one window scheme for disabled
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा, रोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. […]

This year's galap season of the state will start from October 15 - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकार […]

China Former President Jiang Zemin Died
ग्लोबल

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन

चीन : चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ल्युकेमिया या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर हत्याकांडानंतर चीनचे नेतृत्व करण्यासाठी जियांग झेमिन यांची निवड झाली. त्यांनी सुमारे […]

Uddhav Thackery
महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी, न्यायालयाची सुनावणीस परवानगी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याची सुनावणी करण्यास होकार दिला आहे. या प्रकरणावर ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्तेची सीबीआय, ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय 8 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार […]

Session of accidents continues in Navle Pul area of Pune, driver lost control of pickup and accident
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच, चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून अपघात

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून अपघात झाला, यात पिकअप महामार्गावर पलटी झाला. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच […]

Vice Chairman Of Toyota Kirloskar Motor Passed Away
देश

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

बेंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज (बुधवार) दुपारी 1 वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. कंपनीने […]

Chief Minister Eknath Shinde directed that the approval process for financial assistance from the Chief Minister's Medical Assistance Fund should be expedited
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत नक्कीच मदत […]

National Sculpture Award given to three artisans from Maharashtra
देश मनोरंजन

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त […]

Guardian Minister Mangalprabhat Lodha to launch one window scheme for disabled
नाशिक महाराष्ट्र

नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणी चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त […]