मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी आदी उपस्थित होते.
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुंबईत कलम 144 लागू, 4 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ‘या’ गोष्टींवर निर्बंध
मुंबई : मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत संपूर्ण मुंबईतही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. याशिवाय जाहीर सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार 4 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे. मुंबई […]
सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे
मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सीमाप्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सनदशीर, लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील यांचे शासकीय निवासस्थान सिंहगड येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक समिती […]
आता फाईल्सचा प्रवास होणार कमी! राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली, जाणून घ्या…
मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव […]
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय […]
मोठा दिलासा! पूर्व विदर्भातील ‘या’ पाच जिल्ह्यांतील कृषीपंप ग्राहकांना दिवसा 12 तास वीज पुरवठा होणार
मुंबई : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यामुळे या जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होणार आहे. राज्य शासनाच्या […]
गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात, डोके आणि बरगडीला दुखापत, रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. ज्यामध्ये गायकाला कोपर, बरगडी आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडून जखमी झाले. त्यांच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. कपाळावर आणि डोक्यालाही मार लागला […]
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी
मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची प्रलंबित असलेली विशेष पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले […]
नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण विभागातील १०३२ अभियंत्यांना […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात मद्य विक्रीस बंदी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जारी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ.जी.आय. विभाग, मुंबई शहर यांच्या कार्यक्षेत्रातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन […]










