इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या संसदेने विवाहापूर्वी लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. म्हणजेच आता इंडोनेशियामध्ये लग्नाआधी कोणाशी शारीरिक संबंध ठेवणे बेकायदेशीर आणि गुन्हा मानला जाईल. या नव्या कायद्यानुसार केवळ पती-पत्नीच शारीरिक संबंध ठेवू शकतात. दुसरीकडे, एखाद्या विवाहित जोडप्याने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले तर ते देखील गुन्ह्याच्या कक्षेत येईल. कारवाई कधी होणार? […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने निधन
मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सारख्या गाजलेल्या नाटकात अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण […]
WhatsApp ने युझर्ससाठी आणलं जबरदस्त फिचर, व्हिडीओ कॉलिंगदरम्यानही करू शकणार मल्टीटास्किंग, जाणून घ्या…
नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp युझर्ससाठी सतत नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट्स आणत असतात. आता व्हॉट्सऍपने व्हिडिओ कॉलिंगदरम्यान मल्टीटास्किंग सक्षम करण्यासाठी पिक्चर-इन-पिक्चर मोड आणला आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलिंगदरम्यान इतर ऍप्सचाही वापर करता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने बीटा चाचणीसाठी कॉन्टॅक्ट कार्ड शेअर फीचर जारी केले आहे. […]
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
पुणे : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, […]
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत […]
जी 20 परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी
नवी दिल्ली : जी २० परिषदेच्या निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. […]
बालकांसाठीच्या पोषण आहारात वेळोवेळी आवश्यक सुधारणा कराव्यात – पालकमंत्री विजयकुमार गावित
नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्युच्या समूळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. […]
राज्यातील गड व किल्ले यांचे जतन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना
मुंबई : राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरीय समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, संजय […]
हृदयद्रावक! निलांचल एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या गळ्यातून लोखंडी रॉड गेली आरपार, जागीच मृत्यू
उत्तर प्रदेश : दिल्लीहून येणाऱ्या निलांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सुलतानपूर येथील एका प्रवाशाच्या गळ्यात लोखंडी रॉड आरपार घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमना आणि डांबर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेनमध्ये घबराट पसरली होती. प्रवाशाचा मृतदेह रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. हरिकेश संतराम दुबे रा. सुलतानपूर, असे प्रवाशाचे नाव आहे. अलिगडजवळील डाबर आणि सोमना रेल्वे स्थानकादरम्यान […]
लाइव्ह मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत बिघडली. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पॉन्टिंगच्या सहाय्यकांनी त्याची […]










