मुंबई (प्रतिनिधी) : देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
स्वर्गीय आमदार सौ मुक्ता शैलेश टिळक यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर
पुणे : स्वर्गिय आमदार सौ.मुक्ता शैलेश टिळक यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिरांचे आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी रमणबाग प्रशाला (फरशी चे मैदान) येथे ओम ब्लड बँक याच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, शिबीरात ४५० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सदर रक्तदान शिबिरास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितत उद्घाटन झाले. सर्व […]
अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा हल्ला, सैरावैरा पळताना १५ जण जखमी
चंद्रपूर : गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सरण रचण्यात आले त्याचवेळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यात पंधराजण जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना वरोरा तालुक्यात येणाऱ्या चिंचाळा गावात घडली. प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील […]
धक्कादायक घटना समोर, धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान
धुळे : धुळे शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं. या घटनेमध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या टँकर चालकाला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, […]
पाळीव श्वानाची हत्या करणं मालकिणीला भोवलं; काहीच वेळात महिलेनं स्वतःही गमावला जीव…
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पाळीव कुत्र्याने स्वतःच्या मालकिणीलाच चावा घेतला. कुत्र्याच्या चाव्यामुळे मालकिणीला इतका राग आला की तिने कुत्र्याला निर्दयीपणे मारलं. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह तलावात टाकण्यासाठी गेली असता ती स्वत:ही पाण्यात बुडाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह आणि मालकिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी […]
गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ २४ रुपयांपासून २५.५ रुपयांपर्यंत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली असली तरी जुलै 2022 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक […]
गुजरातमध्ये कार- लक्झरी बसची भीषण धडक, ९ प्रवाशी जागीच ठार
अहमदाबाद: गुजरातच्या नवसारी परिसरात शनिवारी पहाटे लक्झरी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर लक्झरी बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान […]
घाटकोपरमध्ये मध्यरात्री जलवाहिनी फुटली; पाण्याचा लोंढा वस्तीत शिरला, क्षणार्धात होत्याचे नव्हते
मुंबई : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लोक घरात झोपलेले असताना अचानक ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला. या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे १० फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास […]
आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यांमधील सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नागपूर : मुंबईतील गोरेगाव पूर्व आरे कॉलनीमधील २७ आदिवासी पाड्यांमध्ये आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत संबंधित विभागांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबातचा मुद्दा […]
आदिवासी कुटुंबांचे हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी आराखडा तयार करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नागपूर : नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी कुटुंबांचे हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह आराखडा तयार करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत सदस्य राजेश पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते. डॉ. गावित यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध […]









