नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ २४ रुपयांपासून २५.५ रुपयांपर्यंत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली असली तरी जुलै 2022 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती किती वाढल्या आहेत हे जाणून घेऊ…
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ
- दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत १७६९ रुपये झाली आहे.
- कोलकातामध्ये, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 24 रुपयांनी वाढून 1869.5 रुपये झाली आहे.
- मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1721 रुपये झाली आहे.
- चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25.5 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1917 रुपये झाली आहे.