मुंबई : उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आपत्ती व्यवस्थापन व शोध बचाव पथकाचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक
अमरावती : पूर प्रसंग, आगीची घटना व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीवितहानी न होता, काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महापालिका अग्निशमन दलाने प्रात्यक्षिके सादर करुन त्यासंबधी माहिती दिली. आगीच्या दुर्घटनांमध्ये बहुसंख्य वेळेस मानवाचा निष्काळजीपणा हे कारण दिसून आले आहे. गॅस […]
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढवण बंदर उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, […]
‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य शासनाचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मात्र, आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, […]
‘पिंक व्हॉट्सऍप’द्वारे वापरकर्त्यांची सायबर फसवणूक, मुंबई पोलिसांकडून ‘या’ सतर्कतेच्या सूचना
मुंबई : केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार मुंबई पोलिसांनी नागरिकांना व्हॉट्सऍप पिंक नावाच्या नवीन फसवणुकीबद्दल सतर्क राहण्यास सांगितले आहे. ऍडव्हायझरीनुसार, नवीन गुलाबी लूक व्हॉट्सऍपमुळे दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअरद्वारे एखाद्याचा मोबाइल हॅक होऊ शकतो. फसवणूक करणारे वापरकर्त्यांची सायबर फसवणूक करण्यासाठी आणि त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठी विविध प्रकारच्या नवीन युक्त्या आणि मार्ग शोधून काढतात. वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल जागरूक, सतर्क आणि सावध […]
वारजे भागात पुन्हा कोयता गँगची दहशत, सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत […]
वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड
परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. २१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध निवडून आले. यानंतर आता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर […]
अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डबा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत
अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डबा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू […]
अजित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, म्हणाले – ‘ते करिष्माई नेते’
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही […]
जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदचे लोकप्रतिनिधी यांचे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३’चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, […]










