Deputy Chief Minister Devendra Fadnavis handed over 15 four-wheelers to Latur Police Force
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी […]

Take care so that no village is deprived of drinking water
महाराष्ट्र

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र मुंबई

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मुंबई : सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी […]

admission process for adult deaf and dumb trainees for the year 2021-22
महाराष्ट्र

प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय […]

Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana 2.0 : A strong alternative to conventional energy
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार – देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. राज्य शासनासाठी ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी असून त्यासाठी लवकरच राज्यस्तरावर चार ते पाच हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची निविदा काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

rapecase
क्राईम महाराष्ट्र

घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

पालघर : घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विठ्ठल संकपाळ असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आकाश संकपाळ आणि पीडित महिला हे पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी शेजारी राहतात. ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. २९ वर्षीय महिलेचं लग्न झालेलं असून ती तिच्या पतीसह आरोपीच्या घराशेजारी राहते. […]

crime
पुणे महाराष्ट्र

पुण्यात नक्की चाललंय काय? पोलिस चौकीत जाऊन PSI ला धमकावत केली मारहाण…

पुणे : कात्रज पोलीस चौकीत पोलीस उपनिरीक्षकाला एक महिला व तिच्या मुलाने मारहाण करून धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रीतम चुन्नीलाल परदेशी आणि त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी या दोन्ही आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम परदेशी आणि अक्षय पांडुरंग माळवे (वय २३) या अन्य व्यक्तीमध्ये जोरदार भांडण झाले […]

A person carrying unauthorized pistols and live cartridges was arrested, Sinhagad Road Police conducted a major operation
पुणे महाराष्ट्र

पुणे : अनधिकृत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक, सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी एका व्यक्तीकडून एक अनधिकृत पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तो सध्या कोठडीत आहे. पुण्यातील धायरी येथील चव्हाण शाळेजवळ आधीच पोलिसांच्या निगराणीखाली असलेला आरोपी संशयास्पद कारवायांमध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलीस नाईक राजाभाऊ वेगरे, पोलीस नाईक […]

crime
क्राईम देश

प्रियकराने प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले, 2 दिवसांनी ती शुद्धीवर आली आणि…

बिहार : बिहारमधील नालंदा येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. स्थानिक लोकांनी तिला बेशुद्धावस्थेत आणि गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर उपचारासाठी बिहारशरीफ सदर रुग्णालयात दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नालंदाच्या भगन बिघा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घडली आहे. दरम्यान, दोन […]

Take strict action against bogus seed sellers, CM directs
महाराष्ट्र

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य […]