Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही, गृह विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, […]

Eknath Shinde
महाराष्ट्र सातारा

कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

सातारा : कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील […]

Increase in transparency in the construction sector due to 'Maharera'
पुणे महाराष्ट्र

‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे आणि हे काम ‘महारेरा’कडून अतिशय उत्तम पद्धतीने होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. ऑल इंडिया फोरम ऑफ रियल इस्टेट […]

Department of Social Justice and Special Assistance
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि. रा. […]

try to get immediate help to the affected farmers
महाराष्ट्र शेती

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वितरित होणार

मुंबई : गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख 57 हजार 971 हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

मोठी बातमी! वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस […]

12 people injured in an elevator collapse incident in Lower Parel
महाराष्ट्र मुंबई

मोठी दुर्घटना! मुंबईत वर्ल्ड ट्रेड इमारतीत लिफ्ट कोसळून 12 जण जखमी

मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरातील कमला मिल्समध्ये लिफ्ट कोसळून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड ट्रेड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळून चौथ्या मजल्यावरुन थेट ग्राऊंड फ्लोअरवर आली. लिफ्ट कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड वर्ल्डच्या सी विंगमध्ये […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद, पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद

मुंबई : सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आगामी काळात गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमांद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सलोखा योजनेंतर्गत राज्यभरात सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर […]

41 crores will be made available for the memorial of revolutionary Chapekar brothers in Pimpri Chinchwad
पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार

मुंबई : पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे […]

The Swami of the ashram raped and tortured a minor girl for two years
क्राईम देश

आश्रमाच्या स्वामीचा अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार, अखेर ‘अशी’ झाली सुटका…

आंध्रप्रदेश : आश्रमाच्या स्वामीने एका अनाथ मुलीवर दोन वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित अनाथ मुलीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपी स्वामीला सोमवारी मध्यरात्री अटक केली. पीडितेचे वय 15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे आई-वडील फार पूर्वीच मरण पावले आहेत. नातेवाइकांनी तिला राजमहेंद्रवरमजवळील वसतिगृहात दाखल केले […]