नवी दिल्ली : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत 75 […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचा विकास हाच शासनाचा ध्यास असून मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास ४५ हजारांहून अधिक कोटींच्या विविध विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये पाणी वळविण्यासाठी १४ हजार कोटींची शासनाकडून तरतूद करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला […]
राज्य शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लातूर : राज्य शासन गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतींच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]
पुणे : निगडीतील एका लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निगडीतील एका लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना […]
कात्रज बोगद्याजवळ ड्राय फ्रुट घेऊन जाणारा ट्रक उलटला, सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगद्याजवळ आज ड्राय फ्रुट घेऊन जाणारा ट्रक उलटला. या घटनेत कोणतीही मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नसली तरी या अपघातामुळे बेंगळुरूकडे जाणार्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक वाहतूक पोलिसांनी प्रवाशांची आणखी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ मदतकार्य करत वाहनांची वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. शनिवारी सकाळी साडेदहा […]
पुणे : ससून रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक गुडघा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे : संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणारे शहरातील ससून जनरल हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. ही पुण्यातील सरकारी रुग्णालयाची मोठी उपलब्धी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील ६० वर्षीय व्यक्तीवर ८ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाला दोन्ही गुडघ्यांच्या गंभीर ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास होता. त्यांच्या डाव्या बाजूच्या गुडघ्यावर रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी सर्जनने योग्य काळजी घेऊन […]
मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्त सर्व मंत्री शहरात उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील मंत्रिमंडळाची बैठक संपली असून त्या नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असं […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार
मुंबई : स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराज्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक आर. जगन्नाथन […]
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती […]
राज्यात नवीन रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत […]










