मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ मोहीम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे, असे मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी प्रसिद्धीसपत्रकाद्वारे कळविले आहे. नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग व नावीन्यता विभागातर्फे स्टार्टअप धोरण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मंत्री सुधीर मुनगंटीवार आता व्हॉट्सॲप चॅनेलवर; व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्याचे आवाहन
मुंबई : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आता राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपवरून जोडले गेले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मंत्री मुनगंटीवार यांच्या ‘Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत असलेल्या तीनही विभागांचे महत्त्वाचे निर्णय, त्यांनी केलेली विविध कामे, संबंधित योजना, विविध विकास प्रकल्प […]
पुणे : ओतूर परिसरात भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर – कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरातील कोळमाथा या ठिकाणी पिकअपने एकाच वेळी एका पायी जाणाऱ्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातात दोनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
पुणे : कालव्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दाम्पत्याचा बुडून मृत्यू
पुणे : पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एक महिला आणि तिचा पती यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी मुठा कालव्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी भागातील हे कुटुंब कालव्याजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्यांचा एक मुलगा रणजीत पोहण्यासाठी कालव्यात उतरला आणि अचानक बुडू लागला. त्याची आई सोनी कश्यप […]
श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
श्रीनगर : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी […]
काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्रीनगर : महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब […]
छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय होणार – मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार असल्याचा निर्णय आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना […]
आगामी काळातील सार्वजनिक सण उत्सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरा करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यातील मोठा उत्सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण, उत्सव तोलामोलात, जल्लोषात, उत्साहात, गुण्यागोविंदाने, शांततेत, भक्तिभावाने मंगलमय वातावरणात कोणताही गालबोट न लागता साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या निराला बाजार येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. […]
बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री मिट’चे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरात आयोजन
नागपूर : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार उद्या रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व […]
गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटीबध्द असून समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील एक वर्षात शासनाने सुमारे 112 कोटी रुपये गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दिले असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शहरातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय […]










