पुणे : महाराष्ट्रातील खेळाडू देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘मास्टर स्ट्रोक’ या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पाक्षिकाचे संपादक […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा, पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश
छत्रपती संभाजीनगर : पैठण शहरात अतिक्रमणधारकांना हटविण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करावे असे,निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे रोहोयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पैठण तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, क्रीडा संकुलाच्या सोयीसुविधा, स्मशानभूमी जागा उपलब्धता इ. आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी आस्तिक […]
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनअभिनंदन
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे […]
उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आनंदी आयुष्याची त्रिसूत्री – छगन भुजबळ
नाशिक : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन […]
वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली, शोधमोहीम चालू
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका ३३ वर्षीय व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ही घटना पहाटे 3.45 च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3.45 वाजता पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील रहिवासी असलेला विनय यादव हा इनोव्हा कार चालवत सी लिंकवर आला. त्यानंतर […]
आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर! योजना, निर्णयांची मिळणार अचूक, अधिकृत माहिती…
मुंबई : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत […]
लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले. स्वयंपाकघरात काम करत असताना ते घसरून पडल्याची माहिती मिळत आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती. सूत्राकडून मिळालेल्या माहितूनुसार, हा अपघात होता. अखिल मिश्रा किचनमध्ये जमिनीवर जखमी अवस्थेत सापडले, त्यानंतर रुग्णालयात […]
गुगल मॅप फॉलो करणे बेतले एका व्यक्तीच्या जीवावर, निष्काळजीपणासाठी गुगलवर खटला दाखल
नॉर्थ कॅरोलिना : गुगल मॅपच्या दिशानिर्देशांचे पालन करत असताना कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर निष्काळजीपणासाठी Google वर खटला दाखल करण्यात आला. कोसळलेल्या पुलावरून कार चालवल्यानंतर मरण पावलेल्या नॉर्थ कॅरोलिना येथील व्यक्तीचे कुटुंब तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीवर निष्काळजीपणासाठी खटला भरत आहे, आणि दावा करत आहे की पूल कोसळल्याची माहिती […]
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनेंतर्गत तात्काळ मदत उपलब्ध करुन देऊन दिलासा देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्यक्रम काम आहे. याअंतर्गत मदतीसाठी पात्र ठरलेल्या कुटुंबियांच्या प्रकरणांची प्राथम्याने चौकशी करुन विस्तृत अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्ष तथा विभागीय […]










