मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले. स्वयंपाकघरात काम करत असताना ते घसरून पडल्याची माहिती मिळत आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती.
सूत्राकडून मिळालेल्या माहितूनुसार, हा अपघात होता. अखिल मिश्रा किचनमध्ये जमिनीवर जखमी अवस्थेत सापडले, त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. सर्वजण अहवालाची वाट पाहत आहेत. ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नर्ट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होती. ही बातमी ऐकून ती तातडीने परतली.
As per reports on ETimes, actor #AkhilMishra, best known for his roles in films like #3Idiots, passed away at 58. The actor reportedly slipped in the kitchen.
Our deepest condolences go out to his loved ones during this difficult time. pic.twitter.com/Sox1jpC98G
— Filmfare (@filmfare) September 21, 2023
लोकप्रिय अभिनेता अखिल यांनी अनेक चित्रपट तसेच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले होते. उतरण, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर यांसारख्या डेली सोपमध्ये त्यांनी काम केले आहे. 3 इडियट्समध्ये ग्रंथपाल दुबे यांची छोटी भूमिका करून आणि टीना दत्ता आणि रश्मी देसाई अभिनीत उतरणमध्ये उमेद सिंग बुंदेला यांची भूमिका साकारून त्यांनी लोकप्रियता मिळवली. डॉन, गांधी, माय फादर, शिखर, कमला की मौत आणि वेल डन अब्बा यांसारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले.
जर्मन अभिनेत्रीशी केले लग्न
अखिल मिश्राची पत्नी जर्मन अभिनेत्री आहे. तिचे नाव सुझान बर्नर्ट. 3 फेब्रुवारी 2009 रोजी दोघांचे लग्न झाले. सुझैनने ‘कसौटी जिंदगी की’, ‘सावधान इंडिया’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘पोरस’ अशा अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे.