मुंबई : देशभरात अनेक बनावट अॅप्स सापडली आहेत, ज्यामुळे मोबाईल यूझर्सला लॉटरीच्या नावाखाली फसवणूक होण्याचा धोका आहे. लॉटरी अॅप्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक बनावट अॅप्स उघडकीस आले आहेत. केरळमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. केरळ पोलिसांनी गूगल आणि मेटाला नोटीस बजावली असून, गूगलला 60 फेक लॉटरी अॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यूज […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात २२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त […]
‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे. शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये […]
बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’, गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी
मुंबई : राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी शासन कार्यवाही करीत आहे. राज्य शासन गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरीता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही सज्ज करण्यात आला […]
निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी राज्यस्तरावर, तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयांच्या समन्वयासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवास व्यवस्था, वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज […]
शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी, २५ वर्षीय प्रियकराला संपवले
नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी […]
घृणास्पद! शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत केला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, शिक्षकावर गुन्हा दाखल
बाळापूर : अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याळाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक शाळेत मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद सरदार हा शिक्षक म्हणून कार्यरत होता. प्रमोद गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या […]
धक्कादायक घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी लिहून शिक्षिकेवर गंभीर आरोप
कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या […]
कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
मुंबई : सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. २०२३ च्या खरीप […]
सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू
बिहार : बिहारच्या जेहानाबादमध्ये श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ७ कावड धारकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते […]









