double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
क्राईम नाशिक महाराष्ट्र

शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी, २५ वर्षीय प्रियकराला संपवले

नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती, नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका 25 वर्षी तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली असून हत्या झालेल्या तरुणाचं नाव गगन कोकाटे असल्याचे उघडकीस आले. गगन हा राहणार मसरूळ परिसरातील होता, त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षकेशी ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमप्रकरणात गगन हा वारंवार भावना यांना भेटण्यासाठी त्रास देत असायचा, त्याचा राग मनात धरून चक्क शिक्षिका पेशा असलेल्या भावना कदम यांनी गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकरी ताब्यात घेतले आहे यात दोन विधीसंघर्षित बालकांसह 5 जणांना अटक केली आहे. यात संकेत दिवे (20) मेहफूज सय्यद (18), रितेश सपकाळे (20) गौतम दुसाने (18) आणि मुख्य आरोपी भावना कदम यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिक शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एका शिक्षकेकडूनच असा प्रकार घडल्याने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रातील अनैतिक संबंधाच्या घटना आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम हा मुद्दा समोर आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत