मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात २२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.
संबंधित घडामोडी
जिल्हा वार्षिक योजनेचा 100 टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. कमीत कमी […]
जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी’च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदचे लोकप्रतिनिधी यांचे ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत २०२३’चे आयोजन करण्यात आले. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक […]
दादांना दीर्घायुष्य लाभो, सुप्रिया सुळेंचं ट्वीट, तर समर्थकांचा कठोर होण्याचा सल्ला…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळाच योगायोग पाहायला मिळत आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही २२ जुलै हा जन्मदिवस. त्यामुळे विविध नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. राष्ट्रवादीत गेल्या वर्षी जुलै महिन्यातच फूट पडली आणि […]