Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई

सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जागा भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय

मुंबई : सायन येथील म्हाडाची जमीन सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३० वर्षाकरिता भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. म्हाडाने या भूखंडाच्या २४ कोटी २३ लाख ३५ हजार ५३९ कोटी ४० लाख इतक्या किंमती ऐवजी सध्याचा शिघ्रगणकाचा बाजारभाव विचारात घेऊन या भूखंडावर बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतीत […]

Cabinet decision
महाराष्ट्र शेती

मोठी बातमी : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा योजनेचा विस्तार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत आहे. या मिशन मोडवरील या […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन […]

पुणे महाराष्ट्र

राक्षसी कृत्य! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही अटक

पुणे : निगडी येथे शिक्षकाने तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षे हाच प्रकार सुरू होता. 21 ऑगस्टला पुन्हा शिक्षकाने पीडितेला त्रास दिला, यावेळी मुलीने घरच्यांना याविषयी माहिती दिली, त्यानंतर हा धक्क्कादायक प्रकार समोर आला. या विकृत शिक्षकाने 2018 मध्येदेखील शाळेतील एका मुलीशी असेच अश्लील चाळे केले होते, तेव्हा […]

rain in maharashtra for next three days
पुणे महाराष्ट्र

राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर पुण्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आजपासून पुढील चार दिवस मान्सून सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. […]

महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे ,उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, ऊर्जेची बचत व्हावी यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांसह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.त्यानुषंगाने मुख्यमंत्री […]

occasion of Public Ganeshotsav
महाराष्ट्र

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी, ‘या’ वाहनांना निर्बंध लागू नाही

मुंबई : गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची ९.८ टक्के दराने परतफेड

मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड २३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त […]

sheep
महाराष्ट्र

चराई क्षेत्रासह मेंढपाळांच्या विविध मागण्यांवर उपाययोजनांसाठी समिती स्थापन करण्यात येणार

मुंबई : वनक्षेत्रातील मेंढपाळांच्या चराई क्षेत्रासह विविध मागण्यांवर शासनास उपाययोजना सूचविण्यासाठी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये वन विभाग, वित्त विभाग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव, आमदार आणि मेंढपाळांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असेल, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वनमंत्री सुधीर […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
पुणे महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि […]