newly married couple found dead
अहिल्यानगर महाराष्ट्र

नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरु

अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना […]

Pune: Woman threatened with weapons and sandalwood tree stolen from Prabhat Road area
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाची चोरी, चोर शस्त्रांसह बंगल्याच्या आवारात शिरले आणि…

पुणे : पुण्यातील ७० वर्षे जुन्या चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेण्याची घटना दहा ऑगस्टला पहाटे घडली.उच्चभ्रू आणि वर्दळीच्या अशा प्रभात रस्त्यावरील भारती निवास कॉलनीतील एका बंगल्यात हत्यारे घेऊन आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने धमकी देत ही चोरी केली. या प्रकरणी अनघा परळीकर (वय ४१) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांच्या टोळक्याविरुद्ध तक्रार […]

Manoj Jarang got upset
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली काल पुण्यात पोहचली आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले. मात्र, शांतता रॅलीला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे यांना भोवळ आली आहे, त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मनोज जरांगे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो, आमच्या मागण्या पूर्ण […]

son killed father
क्राईम महाराष्ट्र

धक्कादायक घटना! जन्मदात्याला संपवलं, मृतदेह नदीत फेकला, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या

धाराशिव : धाराशिवमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे. परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे […]

pune jewelery worth stolen from house worker incident of pashan
क्राईम पुणे महाराष्ट्र

घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना

पुणे : घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात […]

fire rumour in punjab mail passengers jumped from moving train
देश

पंजाब मेल एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून मारल्या उड्या, २० पेक्षा जास्त प्रवासी जखमी

बिलपूर कटरा : पंजाब मेल एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चक्क चालत्या रेल्वेतून उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेत २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, […]

Kolkata Doctor Rape and Murder Case
क्राईम देश

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, ब्लूटूथ ईयरबडच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी […]

Pune Traffic Changes Today 11 August Due To Maratha Reservation Peace Rally
पुणे महाराष्ट्र

पुण्यात आज मराठा आरक्षण शांतता रॅली; वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ भागातील रस्ते राहणार बंद

पुणे : शहरात सारसबागेपासून आज (रविवारी) सकाळी मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार असल्याने रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. रॅली गेल्यानंतर मार्ग पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. शांतता रॅली सारसबाग, पुरम चौक, शनिपार, सेवा सदन चौक, अप्पा बळवंत चौक, गाडगीळ पुतळा, शिवाजी […]

A body was found in the toilet of Nandigram Express
क्राईम महाराष्ट्र मुंबई

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडला मृतदेह, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का […]

The person who sent the obscene audio tape was finally arrested
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न

मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती […]