Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason
तंत्रज्ञान देश

१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली  : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांचे खाते बंद होणार नाही. तर गोपनीयता धोरण स्वीकारण्यासाठी अशा वापरकर्त्यांना १५ मे नंतर एक सूचना पाठविली जाईल. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना काही आठवड्यांसाठी सतत रिमाइंडर्स पाठविले जाईल. या वेळी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सनी नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारल्यास ते चांगले आहे, अन्यथा WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

गोपनीयता धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. वापरकर्ते त्यांच्या चॅट यादी पाहू शकणार नाहीत. यावेळी, केवळ WhatsApp चे येणारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल स्वीकारण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर, येत्या काही आठवड्यांत WhatsApp ने नवीन गोपनीयता धोरण स्वीकारले नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवर येणारी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सूचना येणे बंद होईल. तसेच WhatsApp वर मेसेज पाठविता येणार नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापरणारेही कॉल करू शकणार नाहीत. आपण गोपनीयता धोरण स्वीकारत नसाल तर व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाणार नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या कुठल्याही फीचरचा वापर देखील करता येणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत