गुजरात : गुजरातमधील भरूच परिसरात पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्यात आलं होतं. त्या कोविड सेंटरला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा आणि २ नर्सचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. ही आग कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
पटेल वेलफेअर रुग्णालयाचे ट्रस्टी झुबेर पटेल म्हटले कि, ही फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण भरूचसाठी दुर्दैवी घटना आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने आम्ही रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं आहे. पण या दुर्घटनेमध्ये १४ रुग्ण आणि २ नर्सचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. भरूच रुग्णालयात जीव गमावलेल्या रुग्णांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकार या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर करत आहे, अशी घोषणा विजय रुपाणी यांनी केली आहे.
ભરૂચની હોસ્પિટલમાં લાગેલી આગની દુર્ઘટનામાં જીવ ગુમાવનારા દર્દીઓ, ડૉક્ટરો અને હોસ્પિટલના સ્ટાફ પ્રત્યે શોકની લાગણી વ્યક્ત કરું છું. રાજ્ય સરકાર દુર્ઘટનામાં મૃત્યુ પામેલા પ્રત્યેક મૃતકોના પરિવારજનોને રૂપિયા 4 લાખની સહાય આપશે.
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) May 1, 2021
या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटलं कि, गुजरातच्या भरुच येथील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे मी फार दु: खी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटूंबियांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या स्वास्थ्यासाठी लवकरच प्रार्थना करतो.
भरुच, गुजरात के एक अस्पताल में आग लगने की दुर्घटना से अत्यंत दुःखी हूँ। इस हादसे में जान गँवाने वाले सभी लोगों के परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूँ और घायलों के शीघ्र ही स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) May 1, 2021




