आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांना कोरोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत? यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात जाऊ शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून बिल भरावं लागलं. जर तुम्हाला वाढत जाणारं मेडिकल बिल भरण्यासाठी सेव्हिंगला हात लावायचा नसेल तर अजिबात विलंब न करता लवकरात लवकर पुरेसा आरोग्य कवच खरेदी करा. असे अश्विनी (आरोग्य विमा सल्लगार) यांनी सांगितले..
आम्ही अश्विनी यांच्या कडून जाणून घेतेले कि आरोग्यविमा कोरोना काळात कसा गरजेचा आहे, त्याचा फायदा कोरोना रुग्णांना कसा होईल.. त्या म्हटल्या कि कोविड इतक्या लवकर आपल्यातून जाणार नाही, विमा नियामक आयआरडीएआयने २०२० मध्ये विमा कंपन्यांना कोरोना व्हायरस हा आरोग्य विमा योजनेत कव्हर करण्यास सांगितलं होतं. तुम्ही आरोग्य योजना खरेदी केल्यानंतर तुम्हाला जर कोरोना झाला तर तुम्हाला रुग्णालयातील बिलाच्या खर्चाचे पैसे परत मिळतात.
आरोग्य विमा घेतल्याने कशी मदत होईल?
यावर त्या म्हटल्या कि, आरोग्य विमा योजनेचं महत्व वेगळं अधोरेखित करण्याची गरज नाही. अशा योजनांमध्ये रुग्णालयातील खर्च दिला जातो, ज्यामध्ये रुग्णाचं विलगीकरण, पीपीई किट, निदान आणि आधीपासून असणाऱ्या किंवा नव्याने निर्माण होत असलेल्या व्याधींवरील उपचारांचा समावेश असतो. आपलं वय, शहर, रुग्णालयाचा प्रकार, सध्याचं आणि आधीचं आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करुन आपण योग्य विमा रक्कम निवडावी असा सल्ला दिला जातो. आरोग्य विमा योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला आयुष्यभर याचे हफ्ते भरण्याची गरज नाही. नियमित आरोग्य विमा योजना असणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस आरोग्य विमा योजनेवर दावा असल्यास, विद्यमान आरोग्य विमा योजनेवरील नो-क्लेम बोनसवर त्वरित परिणाम होत नाही. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता जास्त मुदत असलेली आणि मोठी विमा रक्कम असणारी योजना निवडणं जास्त उपयुक्त आहे.
कोरोनासाठी आरोग्य विमा योजना हा मेडिक्लेमचा पर्याय होऊ शकतो का?
अजिबात नाही, कोरोना आरोग्य विमा योजनांमध्ये फक्त कोरोना आजारासाठी लाभ मिळतो इतर कोणत्या आजारामुळे झालेल्या रुग्णालयाचा खर्च यामध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे तुम्ही नियमित आरोग्य विमा योजना घ्या.. कोरोना व्हायरसच्या आरोग्य योजनांना मेडिक्लेमचा पर्याय मानू नका. तुम्ही तुलना करा आणि तुमच्यासाठी, कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजना घ्या. तुम्हाला नियमित आरोग्य योजनेची गरज आहे जी तुम्हाला आयुष्यभर संरक्षण देईल. नियमित आरोग्य योजना मुळात व्यापक असून अपघातासोबत कोणत्याही वैद्यकीय कारणामुळे झालेला रुग्णालयाचा खर्च कव्हर होतो. मॅटर्निटी कव्हरेज, ओपीडी तसंच इतर उपचार लक्षात घेता आरोग्य विमा योजनेची व्याप्ती जास्त आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरस आरोग्य विमा योजना ही नियमित आरोग्य विमा योजनेसाठी पर्याय आहे असं समजू नका.
तुम्ही अद्यापही आरोग्य विमा योजना घेतली नसेल तर तुम्हाला चांगल्या आरोग्यविमा कव्हरच्या आरोग्यविमा योजनेची गरज आहे वेळ न घालवता चांगली आरोग्यविमा योजना घ्या.. हि ती वेळ आहे कुटुंबातील सदस्यांना आणि आपल्याला आर्थिक संकटातून वाचवण्याची.. अश्विनी, आरोग्य विमा सल्लागार (९९७०३८७०३८)



