मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
नवाब मलिक म्हणाले कि, “आमचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. शरद पवारांना हा त्रास झाल्यामुळे त्यांना देण्यात येत असलेली रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना 31 मार्च 2021 रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे पुढील नोटीसपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.”
He is on Blood Thinning Medication which is now being stopped due to this issue.
He will be admitted in hospital on the 31st of March 2021 and an Endoscopy and Surgery will be conducted.
Hence all his programmes stand cancelled until further notice.@PTI_News @ANI— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021




