अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वाशिंग्टन सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९६ धावा केल्या.
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत २ बाद १० अशी इंग्लंडची अवस्था केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवले. अश्विनने बेन स्टोक्सला शून्यावर बाद केले. पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप यांनी ३५ धावांची भागीदारी केली. पोपला अक्षरने १५ धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनने कर्णधार जो रूटला (३०) बाद केले. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी ४३ धावांची भागीदारी केली. अक्षरने फोक्सला माघारी पाठवले, अजिंक्य रहाणेने त्याचा शानदार कॅच घेतला. अक्षरने डोमिनिक बेसला बाद करत इंग्लंडची आठवी विकेट घेतली. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. दुसऱ्या डावात आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ समोरासमोर असतील.
That victory against England means India finish the league phase of the inaugural ICC World Test Championship with a fine view from the top of the table ?#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/rXFiKPXdB7
— ICC (@ICC) March 6, 2021




