Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अनुराग-तापसीची आयकर विभागाकडून कसून चौकशी, रात्रभर 22 ठिकाणी छापेमारी

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

टॅक्स चोरीच्या प्रकरणात आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. अनुराग कश्यप, तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल, मधू मंटेना आणि फँटम फिल्मशी संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाला माहिती मिळाली होती की फँटम सिनेमाच्या कमाईत टॅक्सची चोरी झाली होती. फँटम सिनेमात जो पैसा कमावला गेला त्याची योग्य माहिती देण्यात आलेली नाही.

आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या छापेमारीत अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. टॅक्स चोरीच्या रकमेचं वाटप कसं झालं? यातून काय काय खरेदी करण्यात आलं किंवा मनी लॉण्ड्रिंगसाठी ही रक्कम परदेशात तर पाठवली गेली का? याची माहिती आयकर विभाग घेत आहे.

ब्रेकिंग : अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

आयकर विभागाने मुंबई, पुणे येथे 22 ठिकाणी छापेमारी केली. अनुराग कश्यपच्या फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला. आयकर विभागाचं पथक फँटम फिल्मच्या कार्यालयातही गेलं होतं. आज देखील ही कारवाई सुरु राहू शकते.

मधू मंटेना यांच्या मुंबईतील घरावरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मधू मंटेना यांची कंपनी क्वान टॅलेंट मॅनेजमेंटच्या अंधेरी येथील कॉमर्स सेंटरवरही आयकरच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यानंतर क्वान कंपनीचे चार अकाऊंट्स सीज करण्यात आले.

आयकरच्या या छापेमारीवरुन राजकारण देखील सुरु झालं आहे. अनुराग कश्यप सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. अनेकदा त्याने केंद्र सरकारच्या कारभार धोरणावर टीका केली. यामुळेच्या आयकरच्या या कारवाईवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जाता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत