Corona vaccine taken by Prime Minister Narendra Modi
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१ मार्च) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधानांनी ट्विटर आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा आजपासून सुरू झाला. या टप्प्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेत नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले.

भारतात १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. सामान्यांना वेगाने लस देणे शक्य व्हावे यासाठी लसीकरण मोहिमेत खासगी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. देशातील १० हजार शासकीय लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये २५० रुपयांत लस दिली जाणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत