IND vs ENG : Another blow to the Indian team after the defeat
क्रीडा

IND vs ENG : पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका

IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडची आता ७०.२ अशी विजयाची टक्केवारी झाली आहे आणि त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. तर भारतीय संघाची अव्वल स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे.

आज खेळाला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघाला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज होती. काल रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या दिवशी डावाची सुरूवात केली. जॅक लीचने पुजाराला १६ धावांवर बाद करून दुसरा धक्का दिला. त्यानंतर गिलने सलग तिसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. गिल बाद झाल्यावर विराट आणि अश्विन या दोघांनी १७१ धावसंख्येपर्यंत संघाला नेले. लीचने अश्विनला बाद केले आणि भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर विराटने कसोटीतील २४वे अर्धशतक झळकावले. विराट आणि नदीम किती वेळ मैदानावर थांबतात याची उत्सुकता होती. पण स्टोक्सने विराटला त्रिफळाचित केले. त्यानंतर नदीमला लीचने तर जोफ्रा आर्चरने बुमराहला बाद करत विजय मिळवला.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल २२ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. भारताला यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली पराभव पत्करावा लागला होता. पण आज झालेल्या पराभवानंतर भारताची ही विजयी मालिका खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत