immoral relationships
ब्लॉग

घटस्फोट का होतात किंवा लोक अनैतिक संबंध का बनवतात? जाणून घ्या..

प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा  असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला मिळतात. घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोक आपल्या जोडीदारासोबत कंटाळतात किंवा भांडणं होत असतात. यामुळे काहीजण दुसर्‍या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात. या आधुनिक युगात, अवैध संबंध एक फॅशन बनली आहे. क्षणिक सुखासाठी बरेच संसार मोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. याउलट, बरेच असेही आहेत जे वर्षानुवर्षे त्यांच्या प्रेमाचे खरे नाते टिकवून आहेत.

नाते-संबंधात दोघेही एकमेकांविषयी निष्ठावान आणि विश्वासू असतात तेव्हाच अतूट नाते जोडता येऊ शकते, हे तथ्य आपण नाकारू शकत नाही. वास्तविक, दीर्घ संबंध ठेवण्यासाठी त्या नात्यावर प्रेम आणि विश्वास असणे फार महत्वाचे आहे. परंतु असे असूनही बरेच लोक आपला जोडीदार सोडून तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.

यामागील कारण काय आहे ..?

यावर आम्ही बराच अभ्यास केला. वकीलांशी बोलून या वरील काही कारणे देखील शोधून काढली आहेत. चला तर जाणून घेऊया, अशी कोणती कारणे आहेत त्यामुळे अनेक लोक एकमेकांपासून दूर जातात आणि अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पडतात..

  1. भूतकाळ – प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा भूतकाळ असतो. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या इच्छेने पुढे जाण्यासाठी आपण भूतकाळाचे प्रेम सोडून लग्न करतो, परंतु आपले अंतःकरण ते संबंध टिकवून ठेवण्यास असमर्थ असते. बर्‍याचदा पुरुष त्यांचे पहिले प्रेम विसरत नाहीत आणि भूतकाळातील आठवणी येताच त्यांचा अधिक कल तिकडे वळतो.
  2. शारीरिक आवश्यकता – प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला शारीरिक आणि मानसिक प्रेमाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत जर त्यांना आपल्या जोडीदाराकडून हे प्रेम मिळत नसेल, तर ते तिसऱ्या व्यक्तीकडे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आकर्षित होतात, जे अनैतिक संबंधांचे मुख्य कारण बनते.
  3. एकटं वाटणं – काही लोक खूप भावनिक असतात. अशा परिस्थितीत, जर त्यांना आतून एकटे वाटत असेल आणि भावनिक उणीव जाणवत असेल, तर ती व्यक्ती भावनिक आधारासाठी तिसर्‍या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात करते. जर आपल्या जोडीदाराशी आपले भावनिकदृष्ट्या मजबूत संबंध असतील, तर कोणीही आपणामध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही.
  4. नात्याला कंटाळणे – विवाह हा सर्वात पवित्र संबंध मानला जातो. या नात्यात, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढला पाहिजे. जोडीदाराने आपल्याला वेळ दिला नाही तर अशा परिस्थितीत संबंध कंटाळवाणे होतात आणि समोरील पीडित व्यक्ती तिसर्‍या व्यक्तीच्या शोधाला महत्त्व देण्यास सुरुवात करते.
  5. भांडणात बदला घेण्याची मानसिकता – जोडीदाराबरोबर भांडण होणे सामान्य आहे. परंतु, कधीकधी विवाद इतके वाढतात की नात्यात कटुता येते आणि एकमेकांबरोबर सूड उगवण्याच्या भावनेमुळे तिसरा माणूस आपल्या जवळील व्यक्तीच्या जवळ येतो.

हा लेख तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत