ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विट करत म्हटले कि, “मी अजूनही शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही” असे आहे.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021




