Famous bhajan singer Narendra Chanchal passed away
मनोरंजन

दुःखद : ‘चलो बुलावा आया है’ फेम प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे आज (शुक्रवारी) दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते आणि दिल्लीच्या सरिता विहारमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 27 नोव्हेंबरपासून गायक नरेंद्र चंचल यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याच्या मेंदूत क्लॉटिंग झालं होतं.

अमिताभ बच्चन ते राजकपूर यांच्या चित्रपटांकरिता त्यांनी गाणी गायली होती. यावरून नरेंद्र चंचल यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. अमिताभ बच्चन अभिनीत ‘बेनाम’ चित्रपटात गायिलेलं गाणं अजूनही लोकप्रिय आहे. राजेंद्र खन्ना आणि शबाना आझमी यांच्या ‘अवतार’ या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्यासह नरेंद्र चंचल यांचे ‘चलो बुलावा आया है’ हे गाणे अजूनही तितकेच प्रसिद्ध आहे.

कित्येक दशकांपासून मातेच्या भजनांतून कोट्यावधी लोकांना भक्ती जगात घेऊन जाणारे नरेंद्र चंचल यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत