major law on smoking and tobacco products
देश

धूम्रपानासाठीच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल, नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई, जाणून घ्या..

मुंबई : धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने देशात मोठा कायदा करण्याची तयारी केली असून, या नव्या कायद्याचा मसुदासुद्धा तयार करण्यात येत आहे. या कायद्यानुसार तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे होणार आहे. 18 वर्षांखालील युवकांनी जर धूम्रपान केले तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात आणि नियमन) संशोधन कायदा 2020 या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे करण्यात येणार आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा पुरवठा करताना आढळल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

या नव्या विधेयकाच्या माध्यमातून सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांना विकण्यासाठी निश्चित मात्रा ठरवण्यात येणार आहे. सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, वितरणावर सरकारचे नियंत्रण असणार आहे. तसेच कोणत्याही शैक्षणिक संस्थानाच्या 100 मीटरच्या परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ उत्पान कायद्यातील कलम 7 चे उल्लंघन केल्यानंतर शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाईचीही तरतूद या नव्या कायद्यात करण्यात येणार आहे. नव्या विधेयकानुसार नव्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, या नव्या कायद्याचा सध्या मसुदा तयार होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत