remedies to get instant relief from acidity

अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अ‍ॅसिड रिफ्लक्स, ज्याला सामान्यत: अ‍ॅसिडिटी म्हणतात. ही एक अशी अवस्था असते ज्यात पोटातील अ‍ॅसिडस् परत आपल्या अन्ननलिकेत जातात आणि जळजळ होते. यामुळे आपल्या छातीत जळजळ होते, जे अ‍ॅसिडिटीचे सामान्य लक्षण आहे. अ‍ॅसिडिटीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो. या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. बडीशेप : अ‍ॅसिडिटीपासून आपल्याला त्वरित आराम हवा असेल तर 1 ग्लास गरम पाण्याबरोबर बडीशेप खा. अ‍ॅसिडिटी दूर होईल. थोडीशी बडीशेप घेऊन आपण ती कच्ची भाजलेली दोन्ही प्रकारे खाऊ शकता. बडीशेप रक्त शुद्ध करते. यामुळे पोटात जळजळ, अतिसार होत नाही. बडीशेप आपले वजन कमी करण्यास देखील मदत करते. रात्री बडीशेप पाण्यात भिजवून सकाळी उठून ते पाणी प्या. जळजळीपासून आराम मिळेल.
  2. जिरे : जिरे पाणी पिल्याने अ‍ॅसिडिटी लगेच शांत होते. जिऱ्यांमध्ये असलेले फायबर आणि मिनरल्स पाचन तंत्रामध्ये सुधारणा करण्याचे कार्य करतात. हे आपला चयापचय व्यवस्थित ठेवते आणि पोटातील वेदना कमी करते. जेवणानंतर 1 ग्लास उकळलेल्या पाण्याबरोबर भाजलेले जीरे खा किंवा तुम्ही पाण्यात जिरे 15 मिनिटे उकळू शकता आणि ते पाणी गाळून पिऊ शकता.
  3. आलं : आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. अ‍ॅसिडिटीसाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी आलं फायदेशीर आहे. आले थोडावेळ पाण्यात भिजवा. पाण्याचा रंग बदलल्यानंतर त्यात थोडे मध घालून प्यावे. आपण पाणी गरम देखील करू शकता. यामुळे गॅसची समस्या दूर होईल.
  4. कोरफड : कोरफडमध्ये दाह-विरोधी गुणधर्म आहेत. कोरफडीचा रस पिल्याने पोटातील जळजळ व वेदना दोन्ही बरे होतात. आपल्याला पोटाची इतर काही समस्या असेल तरी आपण कोरफडीचा रस पिऊ शकता. हे पिण्यामुळे पाचन क्रिया मजबूत होते. कोरफडीमुळे पोटाचे अनेक आजार बरे होतात. कोरफड रस तयार करण्यासाठी, कोरफडीच्या पानांपासून रस काढा आणि प्या. यामुळे आपल्याला जळजळीपासून आराम मिळेल.
  5. केळी : केळीचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटी कमी होते आणि छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळतो.
  6. ताक : ताकातील लॅक्टिक अ‍ॅसिडस् पोटातील आम्लता सामान्य करते आणि आरामदायक परिणाम देते. एक ग्लास ताक काळी मिरी आणि कोथिंबीर यांच्यासह घेतल्यास अ‍ॅसिडिटीची लक्षणे त्वरित कमी होऊन आराम मिळतो.
  7. चेरी : चेरीचा रस पिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. चेरीमध्ये फायबरची मात्रा चांगली असते ज्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होत नाही. चेरी शरीराला चांगली उर्जा देखील प्राप्त करून देते, जेणेकरून आपल्याला संपूर्ण दिवसभर ताजेपणा जाणवतो. चेरीमध्ये आढळणारा बीटा कॅरोटीन हृदयरोगासाठी चांगला मानला जातो. चेरीचा रस तयार करण्यासाठी, चेरी एका ग्राइंडरमध्ये बारीक करा आणि त्यातील रस गाळून प्या. आपण त्यात सैंधव मीठ देखील घालू शकता.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत